स्थापना इ. स. १९४०

अखिल भारतीय कीर्तन संस्था

कीर्तन परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रशिक्षणासाठी समर्पित संस्था.

अखिल भारतीय कीर्तन संस्था logo

संस्थेविषयी

कीर्तन विद्येच्या प्रचार व प्रसारासाठी

अखिल भारतीय कीर्तन संस्थेची स्थापना १९४० रोजी दादर येथे झाली. कीर्तन या विद्येच्या प्रचार व प्रसारार्थ एखादी संस्था असावी या विचारातून ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला व कै. शंकरराव कुलकर्णी व कै. गोविंद भोसेकर यांच्या पुढाकाराने या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. गेली अनेक दशके ही संस्था तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून कीर्तन प्रशिक्षणाचे वर्ग चालवीत आहे. कीर्तनाच्या दूरस्थ अभ्यासक्रमाचा सर्वदूर प्रसार व प्रचार करणे, विविध ठिकाणी कीर्तन महोत्सव भरवणे हे संस्थेचे प्रमुख ध्येय आहे.